नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

दसऱ्या चे मराठी एस एम एस

दसऱ्या चे मराठी एस एम एस



मराठी मातीची मराठी शान, मराठी प्रेमाचा मराठी मान,
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान.
Happy Dasara

आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास,
तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात.

आज आहे नवमी उद्या आहे दसरा, आता सर्व प्रॉब्लेम विसरा,
विचार करू नका दुसरा, नेहमी चेहरा ठेवा हसरा.

हिंदू संस्कृती हिंदुत्व आपली शान,
सोने लुटून साजरा करू दसरा आणि वाढवू महाराष्ट्राची शान.

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.

दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी.

झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान
म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं.
पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे
आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदरदसरा.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.